Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले
आळंदी , महाराष्ट्र मिरर
2 min read

Alandi Flood : प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू; नदीवरील चारही पूल वाहतुकीसाठी तातडीने बंद
आळंदी , महाराष्ट्र मिरर
Alandi Flood : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी आणि परिसरात पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी सातत्याने वाढत असल्याने आळंदी शहराला पुराने वेढले असून नदीकाठच्या सखल भागांत पाणी शिरले आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे शहरातील विविध भागांत सुमारे २५० वारकरी अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (alandi flood indrayani river)
अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जाहीर प्रकटन प्रसिद्ध करत नागरिकांना हायअलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे. (Alandi Flood )
https://www.instagram.com/reel/DacEfZINhQO/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंद्रायणीच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी वेगाने शिरले. यामध्ये स्थानिक नागरिकांसह काही भाविक आणि वारकरीही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सुमारे २५० वारकरी वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत.
https://www.instagram.com/p/Dab7hn8oBU0
या नागरिकांच्या सुटकेसाठी स्थानिक प्रशासन, अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान बोटी व आवश्यक बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्यासाठी पालिकेने तात्पुरती व्यवस्था केली आहे.(Alandi Flood )
खबरदारी म्हणून नदीवरील चार पूल बंद
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवर असलेले चारही पूल तात्पुरत्या स्वरूपात सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. पाण्याचा प्रवाह पुलाच्या पातळीच्या जवळ पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुलांवरून पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने तातडीने बॅरिकेड्स लावून हे मार्ग जोडणारे रस्ते सील केले आहेत. (Alandi Flood )
Rain Update : ‘घराबाहेर पडू नका, ६ तारखेपर्यंतचे अलर्ट गांभीर्याने घ्या’
भाविक, वारकरी आणि नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
आळंदी हे वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र असल्याने येथे दररोज हजारो भाविक आणि वारकरी दर्शनासाठी येत असतात. सद्यस्थिती पाहता मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (Alandi Flood )
"वाढत्या पाणीपातळीमुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्र, नदीकाठ किंवा पूल परिसरात जाणे पूर्णपणे टाळावे. बंद करण्यात आलेल्या पुलांवरून किंवा प्रतिबंधित भागातून प्रवास करण्याचा किंवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये. असे कृत्य स्वतःच्या आणि इतरांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते," असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यानिमित्त जादा बसेसचे नियोजन
अफवांवर विश्वास ठेवू नका; सतर्क राहा!
पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर सोशल मीडिया किंवा स्थानिक पातळीवर अनेकदा अफवा पसरवल्या जातात, ज्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीला आणि जाहीर प्रकटनांनाच प्राधान्य द्यावे. (Alandi Flood )
हेही वाचा: Pune FDA : लेबल नसलेले तूप व नमकीन जप्त
सध्याची परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात असून सर्व यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. सर्वांनी सतर्क राहून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता जपावी आणि प्रशासनाला या संकटकाळात पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. शहरातील पूरस्थितीवर पालिका प्रशासन आणि पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. (Alandi Flood )


