Skip to content

Accident: शिरवळजवळ भीषण अपघात; चार तरुणांचा मृत्यू

शिरवळ, प्रतिनिधी

DO
Dhanshree Otari

1 min read

Accident

Accident: भरधाव नेक्सॉन कार मालट्रकला धडकली; दोघे गंभीर जखमी, मध्यरात्री एकच्या सुमारास दुर्घटना

शिरवळ, प्रतिनिधी

Accident: शिरवळ परिसरात महामार्गावर भरधाव कार आणि मालट्रकची भीषण धडक होऊन मावळ आणि तळेगाव परिसरातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. accident pune satara four youths dead

Pune PMC News : खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना

मिळालेल्या माहितीनुसार, सहा तरुण नेक्सॉन कारमधून (एमएच १४ एलजे ३०३३) प्रवास करीत होते. शिरवळ परिसरात त्यांची कार अशोक लेलँड मालट्रकला (केए २७ सी ५८७८) धडकली. धडक इतकी भीषण होती की कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले.

या दुर्घटनेत वेदान्त अर्जुन वारिंगे (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धिरेद्र ठाकुर (वय १९, रा. कामशेत, ता. मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे, ता. मावळ) आणि निखील बाळू राऊत (वय २०, रा. कामशेत, ता. मावळ) या चौघांचा मृत्यू झाला.

तर दिक्षीत दयानंद पुजारी (वय २०, रा. कामशेत, ता. मावळ) आणि मयुर हनुमंत शिंदे (वय २०, रा. बऊर, कामशेत, ता. मावळ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Accident

अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आली असून, घटनेची शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत

State Excise Pune ACB Trap : 22 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Share