Skip to content

शेताच्या वाटेवरून वाद; पिता-पुत्राला मारहाण

बावडा येथील घटना; दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

शेताच्या वाटेवरून वाद; पिता-पुत्राला मारहाण
बावडा येथील घटना; दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर : शेताच्या वाटेवरून झालेल्या वादातून दोघांनी पिता-पुत्राला उसाने मारहाण करून जखमी केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बावडा येथे घडली. याप्रकरणी हरिदास भानुदास घोगरे आणि सोमनाथ हरिदास घोगरे (दोघेही रा. बागलफाटा, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुभाष शरद घोगरे (वय ३२, व्यवसाय शेती, रा. बावडा-बागलफाटा, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास बावडा गावच्या हद्दीतील गट क्रमांक ७३० मध्ये शेताच्या वाटेवरून वाद झाला. या वादातून आरोपी हरिदास घोगरे आणि सोमनाथ घोगरे यांनी फिर्यादी सुभाष घोगरे आणि त्यांच्या वडिलांना उसाने मारहाण केली. त्यांच्या पाठीवर, हातावर, उजव्या पायाच्या मांडीवर आणि छातीवर उसाने मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गोरवे करीत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper