Skip to content

भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा ; पुणे महानगर परिवहन महामंडळाचा उपक्रम

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने गुरूवारी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
पुणे महानगर परिवहन महामंडळाचा उपक्रम

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने गुरूवारी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास सहव्यवस्थापकीय संचालक आदरणीय अलिश पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महामंडळातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला प्रदान केलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये अधोरेखित करण्यात आली. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील लोकशाही तत्त्वांचा आदर राखण्याचा तसेच ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आणि कार्यपद्धतीत अंगीकारण्याचा संकल्प करण्यात आला.

https://epaper.maharashtramirror.com/

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper