दहीहंडी उत्सवात गोळीबार करून दहशत माजवणारी टोळीवर मोक्का
कोंढवा पोलिसांकडून करण्यात आलेली पाचवी मोक्का कारवाई
2 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : कोंढवा परिसरातील दहीहंडी उत्सवादरम्यान अग्निशस्त्राचा वापर करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आकाश वसंत कंचीले याला टोळीप्रमुख घोषित करण्यात आले असून, त्याच्यासह एकूण नऊ जणांची नावे या प्रकरणात नमूद आहेत. त्यापैकी काही आरोपी पाहिजे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(३), ३५१(२), ३५२, आर्म्स अॅक्ट कलम ३(२५), क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट १९३२ चे कलम ३ व ७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१)(अ) सह १३५ नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आता मोक्का कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील टोळीप्रमुख आकाश वसंत कंचीले (रा. फिरदोस मस्जिदजवळ, लक्ष्मीनगर, येरवडा) हा पाहिजे आरोपी आहे. त्याच्यासह दिनेश रामदास घाडगे (वय २५, रा. कोंढवा खुर्द), कार्तिक महादेव पांडागळे (वय १९, रा. कोंढवा खुर्द), विजय रामदास चौधे (वय १८, रा. येवलेवाडी), जितेंद्र ऊर्फ दादू जालिंदर भालेराव (वय २२, रा. अंतुलेनगर, येवलेवाडी), लक्ष्मण ऊर्फ सोनू ऊर्फ जांभ्या शिवाजी गजरमल (वय २६, सध्या रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द), प्रज्वल ऊर्फ पज्या बापू कदम (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), धम्मा शशिकांत साळवे (वय २०, रा. पिसोळी) आणि आर्यन थोरात यांची नावे टोळी सदस्य म्हणून नमूद आहेत. आकाश कंचीले, धम्मा साळवे आणि आर्यन थोरात हे पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आकाश कंचीले आणि त्याच्या अन्य चार साथीदारांविरुद्ध येरवडा, कोंढवा, लोणी काळभोर आणि विमानतळ पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. चालू वर्षात कोंढवा पोलीस ठाण्याकडून गुन्हेगारी टोळीविरुद्ध करण्यात आलेली ही पाचवी मोक्का कारवाई आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले आणि पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शेखर कोळी आणि पोलीस अंमलदार एकांडे, चव्हाण व माने यांनी ही कारवाई केली.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




