Skip to content

कांद्याच्या दराला मोठा फटका; नऊ दिवसांत प्रतिक्विंटल १,७४९ रुपयांची घसरण

लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर चार हजारांवर; दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांची चिंता वाढली

Smita Kulkarni
Smita Kulkarni

1 min read

Onion
Onion

Onion नाशिक – कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींत पुन्हा वाढ झाली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, अवघ्या नऊ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १ हजार ७४९ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर आता प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दरातील घसरणीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.

मागणीपेक्षा पुरवठा अधिक

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे. त्यामुळे बाजारभावावर दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याचाही भारतीय कांद्याच्या निर्यातीवर आणि बाजारभावावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी

कांद्याच्या दरातील सातत्यपूर्ण घसरणीमुळे उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही बाजारभावातून निघणे कठीण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने बाजारात हस्तक्षेप करावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror