Skip to content

कचरा उचलण्यास नकार दिल्याने कामगाराला मारहाण

वाकड पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

कचरा उचलण्यास नकार दिल्याने कामगाराला मारहाण
वाकड पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : फळगाडीवाल्यांनी टाकलेला कचरा उचलण्यास नकार दिल्याने दोघांनी मिळून एका गवंडी कामगाराला लाकडी रंद्याने मारहाण केली. ही घटना रविवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी माणिक बंडू राठोड (५६, ताथवडे, मूळ पाटोदा, जि. हिंगोली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद साजीद चांद शेख (३२, थेरगाव, मूळ नांदेड) आणि इब्राहिम युसुफ सय्यद (३१, थेरगाव, मूळ परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डांगे चौक येथे कामाच्या शोधात थांबले होते. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती फळांचे लाकडी बॉक्स घेऊन त्यातील कचरा आणि गवत तिथेच टाकून निघून गेली. ती व्यक्ती फिर्यादीसोबतच आहे असे समजून फळगाडीवाल्यांनी फिर्यादीला तो कचरा उचलण्यास सांगितले. फिर्यादीने कचरा उचलण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मोहम्मद शेख याने फिर्यादीच्या पिशवीतील गवंडी कामाचा लाकडी रंदा काढून त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper