Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी महामंडळाची स्थापना
Chief Minister Eknath Shinde Established Auto Rickshaw And Meter Taxi Corporation मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील रिक्षा चालक संघटने कडून भव्य सत्कार
मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने रिक्षा आणि टॅक्सी चालक महामंडळाची स्थापना मागील कॅबिनेट बैठकीत मान्य केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांकरिता एक महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे रिक्षा आणि टॅक्सी चालक यांच्याकडून जाहीर सत्कार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ठाण्यातील रिक्षा टॅक्सी चालकांनी सत्कार करण्याच्या दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की,मुख्यमंत्री झाल्यापासून माझे अनेक सत्कार झाले, जिथे जातो तिथे सत्कार होतात, सध्या तर महिला भगिनी रोजच राख्या बांधतात मात्र आजचा हा सत्कार माझ्या कुटूंबाकडून झालेला सत्कार असल्याने त्याचा विशेष आनंद वाटत आहे असे मत व्यक्त केले.
रिक्षा टॅक्सी ही अशी सेवा आहे जी सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाला देतो. ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही ते रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करतात. मात्र ते काम प्रामाणिकपणे केलं तर त्यात नक्की यश मिळते हे मी स्वतः अनुभवले आहे असे याप्रसंगी स्पष्ट केले.रिक्षा आणि टॅक्सीसाठी सूरु केलेल्या महामंडळाच्या माध्यमातून जीवन विमा अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50 हजारापर्यंत अर्थसहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कामगार कौशल्य वृद्धी योजना, परवानाधारक चालकांना निवृत्तीनंतर सानुग्रह अनुदान देणार, नवीन रिक्षा घेण्यासाठी मिळणाऱ्या कर्जाला शासन हमी देणार, शासनाच्या इतर कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात येणार असल्याचे यासमयी स्पष्ट केले.
तसेच सध्या रिक्षा टॅक्सीवर लावण्यात येणारा दंड पंधराशे वरून दोनशे रुपये करू मात्र वाहतुकीची शिस्त कुणीही मोडू नये असे सांगितले. तसेच रिक्षांच्या नवीन परवान्यांवर मर्यादा आणू, पार्किंगसाठी लावण्यात आलेला दंडही माफ केला आहे असे स्पष्ट केले.
राज्य सरकारनं ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, जे रोज रोजंदारीवर काम करतात अशा गोर-गरिबांसाठी या कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात आलीय. तसेच राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट करण्यात येईल. यासाठी जर्मनीसोबत आम्ही रोजगाराबाबत करार केला आहे. यात चार लाख तरुणांना तिथे रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.