Mira Road Traffic Update : वाहतूक विभागाकडून मिरा-भाईंदर शहराअंतर्गत रस्ते खोदकामाची कामे मान्सुनपुर्व बैठकीतून आढावा
Due To Surya Water Project Mira Road Traffic Became Little Busy : सुर्या प्रकल्प योजने अंतर्गत पिण्याचे पाणी जलवाहिनीची जोडणी, आयुक्तांकडून सूचना
मिरा रोड :- दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी सांयकाळी 5.30 वाजता काशिमीरा वाहतूक विभाग कार्यालयात मिरा-भाईंदर शहराच्या अंतर्गत सुरु असलेले रस्ते खोदकाम व सुर्या प्रकल्प योजने अंतर्गत पिण्याचे पाणी पुरवठ्याची वितरण नविन जलवाहिनी टाकणेकरिता रस्ता खोदकाम चालू असून सदर रस्ते खोदकामाची कामे मान्सूनपूर्व करणे करिता बैठक आयोजीत करण्यात आली होती. Mira Road Traffic Update
बैठकीमध्ये उपस्थित असलेले विविध रस्ते बांधकाम करणारे कंपनीचे प्रतिनिधी यांना मिरा भाईंदर शहरातील चालू असलेले रस्ते खोदकामची कामे ही मान्सुनपुर्व वेळेत पूर्ण करणे बाबत तसेच उर्वरित असलेले काम हे पावसाळा संपल्यानंतरच चालू करणे बाबत सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी कामे चालू आहेत त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी व नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून ट्राफिक वार्डन ठेवणे, कामाच्या ठिकाणी बॅरीकेटींग करणे, रेडियम पटटी, नाईट ब्लिंकर्स, वाहतूक कोन यांचा वापर करणे बाबत बैठकीमध्ये उपस्थित असलेले बांधकाम करणारे कंपनीचे प्रतिनिधी यांना सुचना दिल्या. Mira Road Traffic Update
बैठकीत अधिकारी उपस्थित
पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) यांचे मार्गदर्शनाखाली व सहायक पोलीस आयुक्त, (वाहतूक) यांचे उपस्थितीमध्ये वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, हंडोरे यांनी आयोजित केलेल्या सदर बैठकीत विविध रस्ते बांधकाम करणारे कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.