मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपीचा शोध
डोंबिवली :- भारतात मोठ्या प्रमाणावर डिजिटल क्रांती घडून येत आहे परंतु या डिजिटल क्रांतीचा अनेक लोक गैरफायदा घेत असल्याची घटना सातत्याने समोर येत आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन आर्थिक फसवणूकीच्या घटना समोर येत आहे. डोंबिवली मध्ये एका इंजिनीयरची अकरा लाखाहून अधिक ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. Dombivli Crime News
सदाशिव मल्लाप्पा गुंडाळा (53 वर्ष) यांना एका महिलेने आणि व्यक्तीने मोबाईलवर एक लिंक पाठवून त्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा होईल अशा प्रकारे आम्हीच दाखविले होते. सदाशिव यांनी त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्या लिंक मध्ये अकरा लाख 25 हजार रुपये गुंतवणूक केली होती. परंतु काही कालावधीनंतर त्याचा परतावा न मिळाल्याने त्यांना त्यांचे आर्थिक फसवणूक दाराचे लक्षात आले आणि त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.एस.ढेंबरे हे करत आहे. Dombivli Crime News
महत्त्वाच्या इतर बातम्या :