Dombivli Crime News : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार, मुलाकडून पोलीस ठाण्यात तक्रार
•डोंबिवलीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
डोंबिवली :- कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.नांदीवली टेकडी डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या राजू शामुवेल हिवाळे (53 वर्ष) आणि पत्नी (47 वर्ष) यांच्यामध्ये भांडणे होत असत.हाच राग पती राजू यांने मनात धरुन पत्नी हिच्यावर झोपलेली असताना चाकुने तीचे पोटावर, हनुवटीवर हातावर व शरीरावर इतर ठिकाणी वार केले आहे.त्या घटनेनंतर मुलगा अनिकेत राजू हिवाळे (25 वर्ष) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात वडीलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. Dombivli Crime News
जखमी महिलेस औषधोपचाराकरिता सायन हॉस्पीटल, मुंबई येथे दाखल करण्यात आहे. प्रकाराबाबत जखमी महिलेचा मुलगा फिर्यादी अनिकेत राजू हिवाळे, वय 25 वर्षे, रा.नांदीवली टेकडी, डोंबिवली पूर्व यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून भा.दं.वि.कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.पी.काळदाते हे करीत आहेत. Dombivli Crime News