Uncategorized

Vijay Shivtare : “माझा नेताच पलटूराम निघाला… विजय शिवतारे यांच्या नावाने सोशल मीडियावर पत्र व्हायरल

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा जागेवरून विजय शिवतारे यांनी बंड पुकारले आणि त्यानंतर त्यांचे बंड थंड झाले या सर्व घडामोडीनंतर विजय शिवतारे यांच्या नावे सोशल मीडियावर पत्र व्हायरल

पुणे :- विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधातील भूमिका मागे घेतली. त्यानंतर विजय शिवतारेंना काही प्रश्न विचारून आरोप पुरंदरचा तह झाला अन् माझा नेताच पलटूराम निघाला असे शिवतारेंवर आरोप करणारे पत्र काल, सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या व्हायरल पत्रास आता विजय शिवतारे यांच्या कडवट शिवसैनिकाने प्रत्युत्तर दिले आहे. पत्र व्हायरल करणाऱ्यास शिवतारे यांचे समर्थक माणिक निंबाळकरांनी सडेतोड उत्तर दिले. ते पत्र देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

काय म्हणाले पत्रात, वाचा जसेच्या तसे…!

प्रिय बोगस शिवसैनिक मित्रा सप्रेम जय महाराष्ट्र !

तू बोगस पत्रप्रपंच केलास हे पत्रातल्या पहिल्या वाक्यातूनच पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसैनिकांनी ओळखलं होतं. शिवसैनिक कधीही स.न.वि.वि. वगैरे शब्दावलीने पारंपारीक पद्धतीचं पत्रलेखन करीत नाही. जय महाराष्ट्र हे आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं संबोधन त्याच्या कायम ओठावर असतं.निनावी पत्र लिहिण्यापेक्षा तो बिनधास्त स्वतःच्या नावाने पत्र लिहितो. त्यामुळे हा उपद्व्याप केवळ महायुतीला विरोधासाठीच केलेला असल्याने आम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही. तसंही तू आधी सामान्य बारामतीकर म्हणून केलेला असाच निनावी पत्रव्यवहार आम्ही अजून विसरलो नाही.बाकी शिवतारे यांचा आवाका ज्यांना जाणून घ्यायचा होता त्यांना तो अगदी व्यवस्थित कळला आहे. तू खरंच शिवसैनिक असशील तर यापुढे उघडपणे स्वतःच्या नाव पत्त्यासह पत्र पाठव. शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा आपल्या तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे.

धन्यवाद.

पुन्हा एकदा सप्रेम जय महाराष्ट्र !

तुझा, (माणिक निंबाळकर) मु. एखतपुर ता. पुरंदर जि. पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0