•Yashashree Shinde Murder Case यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी कर्नाटकाच्या गुलबर्गा येथून अटक केली
नवी मुंबई :- यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी दाऊद याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी दाऊद शेखला कर्नाटकाच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नवी मुंबई पोलिसांनी दाऊद ची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली आहे. दाऊदने हे कृत्य का केले? कशासाठी केले? याची तपास पोलिसांनी न्यायालयाकडे दाऊदची पोलीस कोठडीचे मागणी केली होती. न्यायालयाने चौकशी करिता सात दिवसाचे पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दाऊद आपला गुन्हा कबूल केला आहे. परंतु यशस्वी शिंदेचे काय संबंध होते? याबाबत पोलिसांना सखोल चौकशी करायची असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे.
यशश्रीची हत्या लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. 25 जुलै रोजी यशश्री सकाळी 11 वाजता मैत्रीणीकडे गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. थेट तिचा मृतदेहच उरण रेल्वे स्टेशनजवळ सापडला असल्याचं तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ती बेलापूरला नोकरीला होती. हाफ डे घेऊन ती कामावरून लवकर निघाली होती, अशी माहिती समोर आली होती.25 जुलै रोजी उरण पोलीस ठाण्यात यशश्री शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली होती. त्यानंतर 26 जुलै च्या रात्री मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशश्री शिंदे हिच्या घरच्यांना बोलाविले घरच्यांनी टॅटू वरून आपलीच मुलगी असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली 2019 मध्ये दाऊद शेख याच्याविरुद्ध वास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कर्नाटक मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करायचा.