Daund Sharada School News : माजी न म्हणता ! माझे शिक्षक माझे विद्यार्थी तब्बल वीस वर्षींनी आले एकत्र
[ आठवण शाळेची….! .. उत्सव मैञीचा ]
[ प्रतिनिधी हरिभाऊ बळी ]
Daund sharada School 2004 Batch : दौंड, ता. ९ २००४ – ०५ साली इयत्ता दहावी मध्ये शिकलेले माजी न म्हणता माझे शिक्षक माझे विद्यार्थी तब्बल वीस वर्षींनी बुधवारी ८ मे रोजी शारदा विद्यालय सहजपूर ( ता. दौंड ) शाळेत एकञ आले होते. Daund Breaking News
वीस वर्षांपूर्वीच्या या जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने शारद विद्यालय गजबजले असल्याचे चित्र या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले. ज्या शाळेमध्ये शिकलो, लहानाचे मोठे झालो व गुरुजनांच्या शिकवणीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेञांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो. असे असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, गुरुजनांना भेटावे, सोबत शिकत असलेल्या मिञ – मैञिणी यांच्याशी गप्पा माराव्यात. या संकल्पनेतून २००४ -२००५ या वर्षामध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकलेल्या माजी नव्हे तर माझे शिक्षक माझे विद्यार्थी यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते .
अतिशय उत्साहात व आनंदामध्ये एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येक जण शाळा शिक्षक वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत या घटकांमुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटे मिळाली या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. Daund Breaking News
या समारंभासाठी शाळेचे तत्कालीन शिक्षक पुरुषोत्तम मुरकुटे, विलास कदम यांचा अतिशय जिव्हाळ्याने सत्कार करण्यात आला. यांच्या कौतुकाने सर्व विद्यार्थी भारावून गेले. शिक्षक व विद्यार्थी खऱ्या अर्थाने वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये रमले होते. माजी विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे व्यवस्थापकाची भूमिका निभावली. असेच भेटत राहू, अशी एकमेकांना ग्वाही देत जड पावलाने स्नेहपूर्ण निरोप घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.Daund Breaking News