क्राईम न्यूजमुंबई
Trending

Cyber Crime Awareness : सायबर गुन्ह्यांविषयी समाजमाध्यमांतून जनजागृती कार्यक्रम, मिरा-भाईंदर वसई विरार पोलिसांचा उपक्रम

Narayana e-Techno School – Bhayander. येथे सायबर विभागाकडून जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि वृद्ध व्यक्तींना मार्गदर्शन

विरार :-मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तांच्या संकल्पनेतून सायबर गुन्ह्यांबद्दल Cyber Crime Awareness सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरिता सायबर गुन्हे शाखेच्या Cyber Crime Branch वतीने सायबर गुन्हे जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.Narayana e-Techno School – Bhayander. या विद्यालयात विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि वृद्ध व्यक्तींना पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी मार्गदर्शन केले आहे. Cyber Crime Awareness Latest News

आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार पद्धतीकडे कल दिसून येतो. असे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. तसेच काही नागरिक जास्त पैसे मिळविण्याच्या किंवा कमविण्याच्या अमिषाला बळी पडतात आणि आपल्या बँक खात्याविषयीची सर्व गोपनीय माहितीची देवाणघेवाण करतात. याचाच फायदा घेत काही भामट्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच तरुण-तरुणी आपल्या खासगी आयुष्याची माहिती, छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्याच्या बाबतीत आहारी गेल्याचे दिसून येते. याच खासगी माहितीचा आणि छायाचित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून काही समाजकंटक पैसे उकळतात. या प्रकारच्या गुन्ह्यांबाबत कुठे तक्रार करावी, सायबर गुन्हे शाखेशी कसा संपर्क साधावा तसेच सायबरक्राईम या संकेत स्थळाला भेट देणे याबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हे सायबर गुन्हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. Cyber Crime Awareness Latest News

आपली फसवणूक कशी होऊ शकते, मुलांच्या हातात मोबाइल दिल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, नोकरीबाबतचे खोटे संदेश ओळखणे, महिलांचे लैंगिक छळ करण्यासाठी गुन्हेगार कोणती प्रणाली वापरतात याबाबत माहिती. तसेच सध्या अनेकांचे करोनाच्या पाश्र्ववभूमीवर घरून काम सुरू आहे. अशा वेळेस सुरक्षित इंटरनेटचा वापर करावा, ईमेल खाते आपल्याच संगणकावर सुरू करावे याबाबत सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडून जनजागृती केली जात आहे. Cyber Crime Awareness Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0