Palghar Crime News : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मोठी कारवाई; पालघर भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक, अभिलेखापाल यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
•लाचलुचपत प्रतिबंध विभाग,पालघर डहाणू पोलिसांची कारवाई, तीस हजार रुपयाची लाच घेताना अटक
पालघर :- लाचलोजपत प्रतिबंध विभागाची कारवाई केली आहे Anti Corruption Bureau.भूमि अभिलेखन कार्यालय डहाणू इथे कार्यान्वित असलेले उपअधीक्षक, अभिलेखापाल यांना तीस रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे.यातील तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाच्या मालकीच्या जमीनीची मोजणी भूमी अभिलेखन कार्यालय डहाणू यांच्याकडून करण्यात आली होती. केलेल्या जमीन मोजणीची हद्द दाखवून मोजणी नकाशा (क प्रत) तयार करून देण्यासाठी आरोपी गोरख शंकर घुमरे (39 वर्ष) अभिलेखापाल याने तकारदार यांचेकडे तीस हजार रूपये लाचेच्या रक्कमेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर कार्यालयाकडे तक्रारदार दिली ( Mumbai Crime News )
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारदार अनुषंगाने 26 फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष आरोपी रक्कमेची मागणी करतात अगर कसे यांची पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाच्या मालकीची जमीन मोजणीची हद्द दाखवून मोजणी नकाशा तयार करून देण्यासाठी आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आलोसे क. १ यांनी तीस हजार रूपये लाचेची मागणी करून त्याप्रमाणे आलोसे क.१ यांनी तक्रारदाराकडुन पाच हजार रूपये आणि आलोसे प्रफुल्ल लक्ष्मण संखे (54 वर्षे)यांनी पंचवीस हजार रूपये आलोसे यांचे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, डहाणू येथे सायंकाळी सहा वाजता पंच साक्षीदार यांचेसमक्ष स्विकारली असता दोन्ही आलोसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर कार्यालयाचे सापळा पथकाकडून रंगेहात पकडण्यात आले आहे. दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने भ्र.प्र.अधिनियम 1988 (सुधारणा 2018) चे कलम 7, 7 अ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून Anti Corruption Bureau केला जात आहे. ( Mumbai Crime News )