क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Borivali News : कठोर न्याय! – अल्पवयीन बालकावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दिंडोशी सत्र न्यायालयाकडून 20 वर्षांची सक्त मजुरी

Borivali Police Arrested Criminal : पोक्सो कायद्यांतर्गत महत्त्वपूर्ण निकाल; कस्तुरबा मार्ग पोलिसांनी केलेल्या तपासाचे यश; नराधम आरोपीला तुरुंगात पाठवले

मुंबई :- अल्पवयीन बालकावर अन्याय आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने अत्यंत कठोर शिक्षा सुनावली आहे. या महत्त्वपूर्ण निकालानंतर लहान बालकांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना जरब बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. Borivali Latest Crime News

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असलेल्या नरेशकुमार हरेशकुमार माहोर (वय 44, रा. बोरिवली पूर्व) या आरोपीने पीडित बालकावर लैंगिक अत्याचार केला होता. तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

मा. दिंडोशी सत्र न्यायालय क्र. 09 मध्ये सरकारी अभियोक्ता श्रीमती मालवणकर मॅडम यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच, पोलीस हवालदार मुंढे आणि किणी यांनी साक्षीपुरावा भक्कम ठेवला.

न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भा.द.वि. कलम 377 प्रमाणे 10 वर्षे सक्त मजुरी आणि महत्त्वाचे म्हणजे, पोक्सो (POCSO) कायदा कलम 5 (एल) सह 6 प्रमाणे 20 वर्षे सक्त मजुरी अशी दुहेरी शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षेत दंड न भरल्यास अतिरिक्त सक्त मजुरीची तरतूद करण्यात आली आहे.कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याने यशस्वीरीत्या केलेल्या कारवाईमुळे पीडिताला न्याय मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0