मुंबई

Maharashtra Politics : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट

•वाय बी चव्हाण सेंटर मध्ये शरद पवारांच्या भेटीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ

मुंबई :- एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा चालू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे कारण अद्यापही कळले नाही परंतु शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अनेक नेते अस्वस्थ असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहे. भाजपाने काँग्रेसला सुरुंग लावण्याचा प्रयत्न चालू असताना शरद पवार च्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एकीकडे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा चालू आहे. त्या संदर्भात आज दुपारी शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठकही होणार आहे. या बैठकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या मागणीवर शरद पवारांनी खुद्द सुप्रिया सुळे निर्णय घेतील असे म्हटले होते. त्यामुळे लवकरच शरद पवार गट आणि अजित पवार कडे एकत्र येणार का अशा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्ष राजकीय गणित जुळवण्याचे प्रयत्न चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील दोन ते तीन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच्या शरद पवार गटाच्या बैठकीनंतर नेमके काय निर्णय होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0