Bhiwandi Crime News : मनाई आदेश भंग करणा-या आरोपीला भिवंडी पोलिसांनी केले अटक
•मुंबई, ठाणे, नवी मुंबई पालघर या जिल्ह्यातून आरोपीला दोन वर्ष करिता केले होते तडीपार
भिवंडी :- मनाई आदेश भंग करणार आहे का आरोपीला भिवंडीच्या भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचा तडीपारचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा शहरात वावर होता. आरोपीला मुंबई, ठाणे नवी मुंबई पालघर या जिल्ह्यातून दोन वर्षाच्या कालावधी करिता दोन एप्रिल 2024 रोजी तडीपार म्हणून घोषित केले होते.
मनाई आदेश भंग करणाऱ्या सराईत आरोपीला अटक
आरोपी वैभव गोपाळ पवार (24 वर्ष) हा व्यवसायाने ड्रायव्हरच्या नोकरी करत असल्यामुळे याच्यावर भिवंडीच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी याला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 भिवंडी याच्या गुन्हेगारीमुळे दोन वर्षाकरिता पाच जिल्ह्यातून तडीपार गेले होते. परंतु आरोपी पवार याचा कालावधी संपण्यापूर्वीच मनाई आदेश भंग करत 24 मे 2024 रोजी रात्रीच्या 1.20 सुमारास विठ्ठल नगर भिवंडी येथे भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पथकास आरोपी मिळून आला आहे. आरोपीला भिवंडीच्या भोईवाडा पोलिसांनी अटक केली असून आरोपीच्या विरोधात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वैभव पवार याला अटक केली असून पुढील तपास पोलीस हवालदार रावत हे करत आहे.