Bhiwandi Crime News : कौटुंबिक वादातून खूनाचा प्रयत्न, पतीने पत्नीवर चाकूने केले वार
•Bhiwandi Crime News पतीविरोधात भिवंडीच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 307 कलमा अंतर्गत कारवाई
भिवंडी :- कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या पोटावर चाकू वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भिवंडी मधील या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. भिवंडी मधील राजस्थान अपार्टमेंटच्या बाजूला राहणाऱ्या एका महिलेला धामणकरगाव महिलेच्या पतीने चाकुने वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
राजस्थान अपार्टमेंटच्या बाजूला, भिवंडी येथे, फिर्यादी महिला, (40 वर्षे) रा.धामणकरनाका, भिवंडी व त्यांचे पती आरोपी मुस्ताक अहमद झाकीर अन्सारी, (46 वर्षे) यांचेत कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. त्या भांडणाचा आरोपीत याने राग मनात धरून फिर्यादी यांचे बरगडीवर चाकुने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. जखमी फिर्यादीस औषधोपचारकरिता सायन हॉस्पीटल, मुंबई येथे दाखल करण्यात आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द भा.दं.वि.कलम 307,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हात्रे हे करीत आहेत.