Ulhasnagar Crime News : किरकोळ कारणावरून भांडण ; लादीने फिर्यादीच्या पायावर हल्ला
•Ulhasnagar Crime News उल्हासनगर मध्ये किरकोळ कारणावरून भांडण भांडणामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
उल्हासनगर :- किरकोळ कारणावरून भांडण झाल आणि भांडणाच रूपांतर वादात झाले दोघांच्या वादामध्ये फिर्यादी याच्या पायावर आरोपीने कडप्पा मारून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
धोबीघाट, उल्हासनगर येथे, फिर्यादी जोगिंदर कुमार श्रीप्रल्हाद रावत, (29 वर्षे) व्यवसाय शिलाईकाम, रा.कमलानगर, उल्हासनगर-1 व आरोपी निरज भरत जैन, (38 वर्षे) धोबीघाट, उल्हासनगर-1 यांचेत किरकोळ कारणावरून भांडण होवून त्या भांडणाचा आरोपी याने राग मनात धरून फिर्यादी यांचे पायावर कडाप्पा मारून गंभीर जखमी करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द भा.दं.वि. कलम 307,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.