Bhayandar Crime News : एटीएम कार्डची चोरी बँकेतील पैसे लंपास, तीन आरोपींना अटक
•गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा पोलिसांची यशस्वी कामगिरी ; तीन आरोपींना अटक, आरोपींनी 50 हजार खात्यातून लंपास
भाईंदर :- अनिल लक्ष्मण जाधव (59 वर्ष), यांचे एचडीएफसी बँक भाईंदर पूर्व येथे असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले असता. त्यांचे कार्ड एटीएम मशीन मध्ये अडकले. त्यानंतर एटीएमच्या बाहेर असलेल्या एका व्यक्तीने एटीएम कार्ड काढून देतो असे सांगितले. त्या व्यक्तीने या संधीचा एटीएम बाहेर काढण्याकरिता आपण पिन टाकावे पिन टाकून त्यानंतर ही एटीएम बाहेर निघत नव्हते. त्यानंतर आरोपीने हेल्पलाइन नंबर ला कॉल करूया आणि तिथून मदत मागू असे सांगितले. हेल्पलाइन नंबर ला कॉल करण्याचा बहाणा करत मित्राला फोन करून संबंधित व्यक्तीचे संपूर्ण बँकेची माहिती हस्तगत केली त्यांच्या खात्यातील 50 हजार रुपये चोरी केले. या सर्व घडामोडीनंतर जाधव यांनी लवकर पोलीस ठाण्यात फिर्यादी देत पोलिसांनी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 17 एप्रिल 2024 च्या सायंकाळी 5.10 मिनिटांनी घडली होती.
घडलेल्या घटनेच्या संदर्भात वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा पोलिसांनी त्या घटनास्थळी जाऊन घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन आरोपींना वापी गुजरात या ठिकाणी वास्तव्य असल्याचे पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून तीन आरोपींचे नाव शिवशंकर रामू प्रसाद (25 वर्ष), प्रिन्स विनोद जयस्वाल (28 वर्ष), उपेंद्र सिंग रामप्रवेश सिंग (45 वर्ष) तिन्ही आरोपींना वापी आणि गुजरात या ठिकाणी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीनंतर त्यांनी नवघर पोलीस ठाणे, मिरा रोड, वसई, विरार, मालाड, कांदिवली,बोरिवली, माहीम, जोगेश्वरी, अंधेरी या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले ते पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष – काशिमीरा येथील नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस हवालदार संतोष लांडगे, सचिन हुले, विजय गायकवाड,समिर यादव, सुधीर खोत, पोलीस शिपाई सनी सुर्यवंशी, धिरज मॅगाणे,सतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास नवघर पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे.