पुणे

Maval Lok Sabha Live Update : पनवेलच्या द्वारकादास शामकुमारच्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद ..मतदान करून मिळालेली पैठणी आणि शर्ट पॅन्ट पीसमुळे स्त्री- पुरुष मतदारांमध्ये आनंद

पनवेल :- मावळ लोकसभेचे (Maval Lok Sabha News) आज मतदान होत आहे.या मतदानानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी तसेच मतदाता जागा हो.. स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशाने पनवेल शहरातील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या द्वारकादास शामकुमारने आयोजित केलेल्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला स्त्री-पुरुष मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज सकाळी मतदान करून प्रथम आलेल्या ५१ महिलांना पैठणी तसेच प्रथम आलेल्या ५१ पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात आले.आज सकाळी हे दुकान ७ वाजता उघडण्यात आले होते.फक्त प्रथम येणाऱ्या ५१ जणांनाच ऑफर असल्याने नंबर लागण्यासाठी स्त्री-पुरुष मतदारांची धावाधाव झाली. ज्यांचा नंबर लागला नाही ते मात्र नाराज झाले.

आज मतदान करून आलेल्या मतदारांमध्ये उत्साह होता.हे राष्ट्रीय काम असून आपली ती बांधिलकी आहे.स्त्री-पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी,मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास शामकुमारतर्फे मतदारांसाठी ही फ्री ऑफर ठेवण्यात आली होती असे द्वारकादास शामकुमारचे संचालक शरद पाटील यांनी सांगितले. Maharashtra Lok Sabha Live Updates

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0