Bhayandar Police Arrested Temple Robbers : मंदिरात चोरी करणार आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांच्या तपासात निष्पन्न, दानपेटीतील हजार रुपये चोरीला..भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
भाईंदर :- भाईंदर पश्चिम येथील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला भाईंदर गुन्हे शाखा Bhayandar Crime Branch प्रकटीकरण विभागाने बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांच्या तपासात आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, आरोपीने मंदिराच्या दानपेटीतील हजार रुपये चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात कबुली दिली आहे. Bhayandar Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर पोलीस ठाणे येथे 60 फीट रोडवर असलेल्या श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरात 15 जानेवारी ते 16 जानेवारीच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने दिवसाढवळ्या मंदिराच्या दानपेटीत चोरी झाल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात 457,380 प्रमाणे गुन्हा ही दाखल केला होता. परंतु घटना घडल्यापासून आरोपी हा सातत्याने आपले ठाव ठिकाण बदलत होता. त्यामुळे आरोपीचा तपास घेणे पोलिसांच्या समोर एक आव्हानात्मक होते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आणि आरोपीच्या सीडीआर नंबर प्रमाणे आरोपी हा ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात राहत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अंबरनाथ येथील सापळा रचून आरोपी याला ताब्यात घेतले आहे. आरोपी याचे नाव शाहनुर अख्तर हुसैन खान,(23 वर्ष) आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची सखोल चौकशी केली असता त्याने मंदिरात चोरी केल्याबाबतचे कबुली दिली आहे. तसेच आरोपीच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये ही कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी सध्या आरोपीला न्यायालयीन कस्टडीत असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे हे करत आहे. Bhayandar Police Latest News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि पोलीस आयुक्तालय, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड , पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, दिपाली खन्ना, सहायक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, विवेक सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भाईंदर पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले, पोलीस हवालदार रविंद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव, के.पी. पवार, के.आर. पवार, सुशिल पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे पोलीस शिपाई संजय चव्हाण, सलमान पटवे, राहुल काटकर यांनी केलेली आहे. Bhayandar Police Latest News