Bhavana Gawali : मी नाराज नाही मात्र, मला तिकीट मिळाले नसल्याची खंत ; भावना गवळी
Bhavana Gawali Ready To Rajshree Patil Campaigning Eknath Shinde Shiv Sena : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण एकदा पंतप्रधान करण्याकरिता, राजश्री पाटील यांचा प्रचार करणार ; भावना गवळी
यवतमाळ :- यवतमाळ-वाशिम लोकसभा Washim Lok Sabha Election मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आता विद्यमान खासदार भावना गवळी मैदानात उतरल्या आहेत. मी नाराज नाही मात्र, मला तिकीट मिळाले नसल्याची खंत असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले आहे. मात्र, मी पक्षाची कार्यकर्ती असून लहानपणापासून मला केवळ शिवसेना माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची घोषणा देखील भावना गवळी यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी तसेच उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. Bhavana Gawali Press Conference
मी इतकी वर्षे काम केले. उमेदवारी न मिळाल्याने मला खंत वाटली. शिवसेनेसाठी माझ्या घराने योगदान दिलंय. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात काम उभ केलं. रात्रीचे 12 वाजेपर्यंत ते काम करतात. त्यामुळे मी महायुतीचे उमेदवार जयश्री पाटलांच यांचे काम करणार आहे. यवतमाळ-वाशिममधून महायुतीकडून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा आपण प्रचार करणार आहे.” Bhavana Gawali Press Conference
मी माझ्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे केली आहेत. मात्र, मी प्रसिद्धीपासून दूर होते. तीच माझी चूक होती, असे मला वाटत असल्याचे भावना गवळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र आता झालेल्या गोष्टींचा विचार करत बसणार नाही. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण राज्यश्री पाटील यांच्या प्रचार करणार असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले. मी इतके वर्ष निवडणूक लढवत आहे, त्यामुळे मला प्रचाराचा अनुभव आहे, मी माझ्या पद्धतीने प्रचार करणार असल्याचे भावना गवळी म्हणाल्या. Bhavana Gawali Press Conference