पुणे

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पाटीॅ शरदचंद्र पवार, उपाध्यक्ष पुणे यांच्याकडून 10 हजार पाणी बॉटल चे वाटप

Anand Sawane Donate 10 thousand Water Bottel On the Ocassion Of Ambedkar Jayanti : आनंद सवाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार उपाध्यक्ष पुणे शहर यांच्याकडून आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दहा हजार पाणी बॉटल वाटप, गेल्या दशकापासून सामाजिक उपक्रम

पुणे :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार Sharad Pawar Group Pune गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्याकडून दहा हजार पाणीच्या बॉटलचे वाटप करण्यात येत आहे. गेले कित्येक वर्ष आनंद सवाणे सामाजिक उपक्रमातून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Dr Baba Saheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त समाज-उपयोगी कार्य करत असतात गेली दशकांपासून अधिक कालावधी हे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहेत. आंबेडकर अनुयायी 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Dr Baba Saheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. आनंद सावणे Anand Sawane यांच्या या उपक्रमाला सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित राहत असतात. Ambedkar Jayanti

पुणे रेल्वे स्थानकाच्या जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ हा उपक्रम सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे आनंद सवाणे यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरी फुट पडली असले तरी या कार्यक्रमाला शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोणताही राजकीय द्वेष न ठेवता या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सवाणे यांनी केले आहे. Ambedkar Jayanti

आनंद सावणे म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशातच नव्हे तर जगात साजरी केली जाते. जागतिक नॉलेज डे म्हणून अनेक देशांनी हा दिवस साजरा केला जातो. बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिका संघटित व्हा संघर्ष करा या मूल्य आत्मसात करून एकतेचा संदेश घेत उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व राजकीय मंडळींनी एका व्यासपीठाखाली येऊन समाज उपक्रम आणि समाज हिताचे गोष्टी करावे अशी मी सर्वांना आवाहन करतो. Ambedkar Jayanti

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0