Beed Crime News : एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आवळला मुसक्या, 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड आठवडाभरात पाच हुन अधिक कारवाया, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्या रडारवर भ्रष्ट सरकारी अधिकारी
बीड :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्या वतीने गेल्या दहा दिवसात विविध विभागाच्या अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्याचे धाडसत्र बीड एसीबी विभागाकडून केले जात आहे. एसीबी बीड विभागाच्या रडावर आता भ्रष्ट सरकारी अधिकारी असल्याचे दिसून येत आहे. एस टी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.बीडच्या एसीबीकडे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या दिनेश बाबुराव राठोड यांच्याविषयी लाच संदर्भाने तक्रार आली होती. त्यामुळे, गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाया चांगल्याच चर्चेत आहेत.
जिल्ह्यातील एसटी महामंडळातील कर्मचारी असलेल्या तक्रारदाराने बीडच्या एसीबीकडे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या दिनेश राठोड बाबत तक्रार दिली होती. तक्रारदाराला अंबाजोगाई, परळी येथे नियुक्ती हवी होती. मात्र, त्याठिकाणी त्याला नियुक्ती न देता गावला पाठविण्यात आले होते. दरम्यान, तक्रारदार नियुक्ती देण्यात आलेल्या माजलगावला रुजू झाला नव्हता. 1 महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर त्याच्यावर कारवाईचा ठपका ठेवण्यात आला. सुरुवातीला दिनेश ने तक्रारदाराच्या कडे 70 हजार रुपयांची लाच मागितली होती हजार रुपये लाच ठरवण्यात आले होती.मात्र, या कारवाईत सहकार्य करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बीडमधील कामगार अधिकारी दिनेश राठोडने कर्मचाऱ्याकडे 30 हजारांची लाचेचा पहिला हफ्ता मागितली. मात्र, तक्रारदाराने लागलीच लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून ही लाच स्वीकारताना एसीबीने लाचखोर अधिकारी दिनेश राठोडला रंगेहात अटक केली आहे. त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर ,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, विशाल डोके, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे. यांनी सापळा रचून भ्रष्ट सरकारी अधिकारी असलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक केली आहे.