ठाणेक्राईम न्यूज

Thane Crime News : तहान्या बालकाची विक्री करणाऱ्या टोळक्याच्या आवळल्या मुसक्या, टोळीमध्ये किन्नरचा हि‌ सहभाग

•लहान मुलांचे विक्री करणाऱ्या रॅकेटचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश‌ ; आईसह आठ जणांना अटक

ठाणे :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष ठाणे यांना पंधरा दिवसापासून माहिती मिळाली होती की. मुंब्रा अमृत नगर मध्ये परिसरात राहणाऱ्या सहिदा व साहिल या जोडप्याने तहाने बाळ विक्रीसाठी आणल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी या लहान मुलाचे खरेदी-विक्री करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश करण्याकरिता पोलीसांनी एक युक्ती वापरत आरोपींच्या कृत्याचा उलगडा केला आहे.

आईनेच केले पोटाच्या गोळ्याची विक्री, पोलिसांच्या जाळ्यात रॅकेट अडकले

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांना मिळालेल्या माहितीनुसार पंधरा दिवसापासून पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून मुकेश लागडा यांना तयार करून सहिदा आणि साहिल या आरोपींच्या संपर्कात राहणे सांगितले. 22 मे रोजी संहिता आणि साहिल यांना बनावट ग्राहक यांनी फोन करून त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या 84 दिवसाच्या तहानिला नाशिक वरून येथे आणण्याकरिता पाच लाख रुपये द्यावे लागेल असे सांगितले. 23 मे रोजच्या पहाटे आरोपी यांना मुंब्रा रेतीबंदर बस स्टॉप जवळ येऊन मुलीस पाहून पैसे घेऊन जायला सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी एक पथक तयार केले. या पथकामध्ये अनैतिक वाहतूक मानवी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी एक विशेष पथक तयार करून आरोपींना आपल्या जाळ्यात अडकवून नऊ जणांना अटक केली आहे.

अटक आरोपीचे नावे

1) साहिल उर्फ सद्दाम हुसेन मकबुल अहमद खान (32 वर्षे) मुंब्रा (दलाल व पैसे स्विकारणारा)
2) साहिदा रफिक शेख (40 वर्षे) मुंब्रा, (दलाल)
3) खतीजा सद्दाम हुसेन खान (27 वर्ष) मुंब्रा (तिच्या ताब्यात अडीच महिन्याचे लहान बाळ)
4) प्रताप किशोरलाल केशवानी (23 वर्ष) खेमानी उल्हासनगर, (दलाल)
5) मोना सुनिल खेमाने (30 वर्ष) टिटवाळा पूर्व (दलाल)
6) सुनिता सर्जेराव बैसाने (35 वर्ष) नाशिक (दलाल)
यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता इतर 3 आरोपी पैकी
7) सर्जेराव बैसाने धुळे, (दलाल) हा मुंब्रा येथे असलेबाबत माहीती मिळाल्याने तात्काळ पोलीस पथक पाठवुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच उर्वरीत दोन आरोपी यांना त्यांचे मोबाईल लोकेशन द्वारे तांत्रीक तपासाच्या सहाय्याने आरोपी नाशिक येथे असलेबाबत माहीती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती चव्हाण तसेच पोलीस पथक यांना लागलीच वरिष्ठांचे आदेशान्वये नाशिक येथे पाठवुन उर्वरीत 2 आरोपी नामे
8) शालु कैफ शेख (25 वर्ष) नाशिक (बालकाची आई)
9) तृतीयपंथ नामे राजु मनोहर वाघमारे (30 वर्ष) नाशिक (दलाल) यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून एकूण 9 आरोपी यांचे विरुध्द मुंब्रा पोलीस स्टेशन भारतीय दंड संहीता कलम 370, 38 सह बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 81 व 87 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा मार्फतीने करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेले 84 दिवसाचे बालकास विश्व बालक केंद्र, नेरुळ, नवीमुंबई येथे ठेवण्यात आलेले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक एन. डी. क्षिरसागर, श्रध्दा कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. चव्हाण, डी. के. बालगुडे, डी.जे. भोसले, डी. एस. मोहिते, पोलीस हवालदार एस. पी. नागपुरे, के.बी. पाटील, महिला पोलीस अंमलदार पी. जी. खरात, एच. आर. थोरात, बी.एच. पाटील, के. एम. चांदेकर, यु. एम. घाडगे यांनी त्या तहान 84 दिवसाच्या बालकाची यशस्वीपणे सुटका केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0