Pune News : रविवार पेठेत दुकान फोडून चोरी;चोरट्यांकडून एक लाखांचे पितळी साहित्य लंपास
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : रविवार पेठेतील बंद दुकानाची खिडकी फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीचे पितळी साहित्य चोरून नेले. धनलक्ष्मी मेंटल इंडस्ट्रीज या दुकानात ही घरफोडी झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रविवार पेठेतील हे दुकान बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर पितळेचे कान आणि कडे असलेली दोन पोती चोरून नेली. चोरी झालेल्या साहित्याची किंमत एक लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी शितलादेवी चौक परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ आणि ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस अंमलदार भोसले करीत आहेत.



