ACB Trap News : एक लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Karjat ACB Trap News : कर्जतचे मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
कर्जत :- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. Karjat 1 Lakh Bribe News फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता मंडळ अधिकारी कडाव, तालुका कर्जत जिल्हा रायगड चंद्रकांत केंडे यांनी लाचेची मागणी केली होती. 1 लाख रुपये स्वीकारताना काल (8 जानेवारी ) लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार यांचे मौजे दहिगाव तालुका कर्जत येथील सर्वे नंबरचे फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी या संदर्भात एसीबी ला तक्रार दिली तक्रारदारांच्या तक्रारीवरून पडताळणी करून मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत मंडळ अधिकारी ज्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो ठाणे परिक्षेत्र ठाणे,संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्यूरो ठाणे परिक्षेत्र ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे, सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्यूरो ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड.सहाय्यक फौजदार विनोद जाधव,पोलीस हवालदार महेश पाटील,सागर पाटील, सहाय्यक फौजदार अरूण करकरे,सचिन आटपाडकर यांनी लाचखोर मंडळ अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.