Aaditya Thackeray : महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदलावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावर गंभीर आरोप
- खोके द्या, तरच बदली करतो, आदित्य ठाकरे यांचा आरोप
मुंबई :- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) राज्यात चालू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि अनेक अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, मात्र ते धाब्यावर बसवून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘खोक्यां’ साठी बदल्या रखडवून ठेवल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. Aaditya Thackeray
यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंग चहल व अनेक अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. चहल व अन्य अतिरिक्त आयुक्तांच्या रुटिन बदल्या ओव्हरडयू होऊनही केल्या जात नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. Aaditya Thackeray
मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासकांना असे निर्देश दिले आहेत की, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी मोठमोठी कामे मंजूर करून घ्या आणि इतके इतके खोके आम्हाला द्या, तरच तुमच्या बदल्या होणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले. Aaditya Thackeray