Baramati Crime News : ग्रामसेविकेला पाच वर्षाची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड, न्यायालयाने ठोठावली शिक्षा
Baramati Crime News पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेविकाला पाच वर्षाची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड
बारामती :- पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर करून देण्यासाठी ग्रामसेविका दिपाली जगन्नाथ कुतवळ (37 वर्ष) यांना 28 फेब्रुवारी 2017 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात खटला चालू होता आज झालेल्या सुनावणीत भ्रष्ट आरोपी दिपाली कुतवळ या ग्रामसेवकाला न्यायालयाने पाच वर्षाचा तुरुंगवास तसेच 25 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास शिक्षा चा कालावधी सहा महिन्याकरिता वाढविण्यात येईल असे निर्देश बारामती सत्र न्यायालयाने दिले आहे. Baramati Crime News
नेमकं काय घडले?
ग्रामसेवक दिपाली यांनी यांनी पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करून देणेसाठी 10 हजार रुपयाची लाच मागणी करुन, स्विकारलेबाबत ला.प्र.वि. पुणे विभागाकडून गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक अर्चना दौडकर, ला.प्र.दि. पुणे यांनी पूर्ण करून,अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बारामती न्यायालय, पुणे येथे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते. त्याचा स्पेशल केस क्रमांक 171/2018 असा आहे. खटल्याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बारामती कोर्ट, पुणे यांचे न्यायालयात सुनावणी होवून, दाखल गुन्ह्यामध्ये लोकसेवकाविरद्ध आरोप सिद्ध झाल्याने 05 वर्ष शिक्षा व 25 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा व तसेच दंड न भरल्यास वाढीव 06 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. खटल्याचे शासनाचे वतीने कल्पना नाईक, सहायक सरकारी अभियोक्ता यांना कामकाज पाहिलेले आहे. Baramati Crime News