मुंबई

Mumbai Dry Day : मद्यप्रेमीकरिता महत्त्वाची बातमी ; राज्यात पुढील तीन दिवस “ड्राय डे”

Mumbai Dry Day News : शनिवार पासून ते सोमवार पर्यंत राज्यात सोमवार पर्यंत राज्यात दारूबंदी, तीन दिवस ड्राय डे

मुंबई :- मद्यप्रेमीकरिता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.राज्य शासनाने तीन दिवस राज्यात मद्यविक्रीला बंदी घातली आहे. या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत राज्यात दारुची दुकानं बंद राहतील. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान मुबंईत 20 मे रोजी होत आहे. आर्थिक राजधानीत मतदान होत असल्याने 18 ते 20 मेपर्यंत राज्यात ड्राय डे ची घोषणा केली आहे. (Saturday To Monday Alcohol Shop Closed In Mumbai Due To Lok Sabha)

सोमवार 20 मे रोजी मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार ते पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. (Mumbai Dry Day) पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुंबई शहरात प्रशासनाने 18 ते 20 मे दरम्यान ड्राय डे जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, पालघर, कल्याण आणि ठाणे या महाराष्ट्रातील प्रमुख मतदार संघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये देखील ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे. Mumbai Lok Sabha Election Live Update

मुंबई शहरात 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून दारुची दुकाने आणि बार बंद (Mumbai Dry Day) असतील. 19 मे रोजी संपूर्ण दिवसभर दारु विक्री बंद राहणार आहेत. तसेच, 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेनंतर दुकाने उघडतील. म्हणजेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दारूची दुकाने पुन्हा खुली होतील. याशिवाय 5 जून रोजी सुद्धा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. Mumbai Lok Sabha Election Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0