Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई, कंपनी मालक भावेश भिंडेला अटक
Ghatkopar Hoarding Incident Criminal Arrested : बेकायदा होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhide) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला उदयपूर येथून अटक करण्यात आली असून मुंबईत आणण्यात येत आहे.
मुंबई :- घाटकोपर होर्डिंग प्रकरणी Ghatkopar Hoarding Collapse मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुख्य आरोपी भावेशला उदयपूर येथून अटक केली असून त्याला मुंबईत आणले आहे. Bhavesh Bhide was arrested by the Mumbai Police Crime Branch on Thursday.
घाटकोपरमध्ये 13 मे रोजी कोसळलेल्या होर्डिंगची मालकी असलेल्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड Ego Media Private Limited या जाहिरात संस्थेचे संचालक भावेश भिंडे यांना मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली, त्यात 16 जणांचा मृत्यू झाला आणि 74 जण जखमी झाले.
भिंडे यांच्यावर यापूर्वी 23 गुन्हे दाखल आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यात त्याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला होता. Bhavesh Bhide was arrested by the Mumbai Police Crime Branch on Thursday.