क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Fake Document Racket : मलबारी पोलिसांचे यशस्वी कामगिरी ; बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेची फसवणूक करणाऱ्या आरोपींना केलेल्या अटक

Mumbai Crime News : बनावट कागदपत्रे तयार करून कार लोन घेण्यासाठी बँकेंची दिशाभुल करून फसवणुक करणाऱ्या आरोपीस अटक

मुंबई :- बनावट कागदपत्राच्या (Fake Bank Document) आधारे बँकेची फसवणूक (Bank Fraud) करणारी घटना समोर आली या घटनेमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली असून ज्या बनावट कागदपत्राच्या आधारे कार लोन करण्यात आले त्या कार ला पोलिसांनी जप्त केले आहे.मलबार हिल पोलीस ठाण्याचे हृददीत असणाऱ्या एका बँकेच्या मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दि. 1 फेब्रुवारी 2024 ते दि. 23 मार्च 2024 रोजी दरम्यान नामे तन्मय सरकार (रा. ठि. -पुष्पांजली रेसिडन्सी, फेज १, जी. बी. रोड, ठाणे) त्याचा मॅनेजर मित्र नामे इम्रान हुसेन मेहरदिन खान (रा. ठि- चौधरी चाळ, जोसेफ कम्पाउंड, मालवनी मालाड प. मुंबई ) यांनी आपआपसात संगणमत करून तन्मय तापस सरकार (रा. ठि. पोस्ट सिंद्रानी, ता-बगडा, जिल्हा-उत्तर २४ परगना, पश्चिम बंगाल) यांचे आधारकार्ड, पॅन कार्ड व इन्कम टॅक्स रिटर्न कागदपत्र बेकायदेशीरपणे प्राप्त केली व कागदपत्रामध्ये बनावटीकरण करून कार लोन घेण्यासाठी अप्रामाणिकपणे खरे असल्याचे भासवुन बॅकेंची दिशाभुल व फसवणुक करून 45 लाख चे कारलोन सुपुर्त करण्यास प्रवृत्त केले म्हणून मलबार हिल पोलीस ठाणे कलम 420,468,471,34 भा.द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mumbai Crime News

गुन्हयाच्या तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहितीनुसार, मलबार हिल पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि योगेश माने, पोलीस उपनिरीक्षक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी 13 एप्रिल 2024 रोजी आरोपी नामे इम्रान मेहरहदिनखान हुसैन रेल्वे जयपुर ते बांद्रा या चालु रेल्वेत शोध घेवुन अटक करण्यात करण्यात येवून गुन्हयातील टोयोटा फॉर्च्यूनर कार ही जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मलबार हिल पोलीस ठाणेसोबतच लो. टी. मार्ग पोलीस ठाणेचे पोउनि शिवाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी देखील मोलाची कामगिरी बजावलेली आहे. Mumbai Crime News

आरोपी नामे तन्मय सरकार म्हणजेच अस्फाक मुनाफभाई अजमेरी, (30 वर्ष), धंदा-कार डिलर, अहमदाबाद शहर, गुजरात. हा गुन्हा दाखल झाल्यापासुन स्वतःचे अस्तित्व लपवुन कोठेतरी अज्ञात ठिकाणी राहत होता. दि. 29 एप्रिल 2024 रोजी सदर आरोपी यास ताब्यात घेवुन कसून तपास केला असता, त्याने तन्मय सरकार या नावाने बनावटीकरण करून तयार केलेली कागदपत्रांचा वापर करून बँकेकडून लोन प्राप्त केल्याचे कबुल केले आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असुन पुढील तपास चालु आहे. गुन्हयातील मुख्य आरोपी नामे कौशल भियाणी नावाचा वापर करत असलेला इसम नामे साईनाथ व्यंकटेश गंजी उर्फ विकास, (28 वर्ष), (धंदा-नोकरी मुळ रा.ठि. मासमपिल्ली, ता. मोथकुर, जि. नलगोंडा,) तेलंगणा राज्य यास मुलुंड, मुंबई येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता बनावट कागदपत्रे आरोपी नामे अरफाक मुनाफभाई अजमेरी यास तयार करून दिले बाबतचे कबुल केले आहे. त्यामुळे त्यास दि.1 मे 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. साईनाथ गंजी या आरोपी यांच्यावर यापूर्वी हि गुन्हे खालीलप्रमाणे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. Mumbai Crime News

1) पार्कसाईट पोलीस ठाणे कलम 419,420,465,467,468,34 भादंवि

२) वि.प. मार्ग पोलीस ठाणे (आर्थिक गुन्हे शाखा) कलम 406,420,405,467,471,474,120 ब, 34 भादंवि

3) डी.सी.बी. सी.आय.डी, कुर्ला पो. ठाणे कलम 419,420,465,465,467,471,406,120 ब, 34 भादंवि.

गुन्हयात आतापर्यंत एकूण तीन आरोपी अटक करण्यात आले असून एक टोयोटा फॉर्च्यूनर कार हस्तगत करण्यात आली आहे. अधिक तपास चालू आहे. आरोपीने तपासात बनावट कागदपत्रे तयार करून गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.

पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-02, डॉ. मोहित कुमार गर्ग, सहायक पोलीस आयुक्त, गावदेवी विभाग, विनायक मेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मलबार हिल पोलीस ठाणे, उदयसिंग शिंगाडे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश माने, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कांबळे (एल.टी. मार्ग पो.स्टे.), गुन्हे प्रकटीकरण व सायबर पथकातील अंमलदार यांनी केलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0