ऑनलाइन फसवणूक ; ऑनलाइन घरगुती वस्तू खरेदी करताना एक लाख 76 हजार 654 रुपयाची आर्थिक फसवणूक
Mumbai Cyber Crime News I ऑनलाइन फसवणुकीचे पैसे परत देण्यास मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाला यश
नालासोपारा :- ऑनलाईन फसवणूक Online Cyber Crime होण्याच्या घटना सातत्याने वाढत त्या अनुषंगाने पोलिसांकडून कठोर पावले उचलले जात आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात आहे.ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पैसे परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील वालीव पोलीस ठाणेचे हद्दीतील तक्रारदार नामे कौशल हे ऑनलाईन घरगुती वस्तु खरेदी करीत होते. ऑनलाईन खरेदी करीत असताना ऑनलाईन पेमेंट करण्याकरीता क्यू आर कोड पाठवून त्यावर स्कॅन करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी क्यू आर कोड स्कॅन केला असता त्यांचे बैंक खात्यातुन 1 लाख 76 हजार 645 रु कपात झाल्याबाबत मॅसेज त्यांचे मोबाईलवर प्राप्त झाला. तक्रारदार यांचे फसवणुकीबाबत सायबर पोलीस ठाणे Mumbai Cyber Thane येथे 1 एप्रिल 2024 अन्वये प्राप्त करण्यात आला आहे. Mumbai Cyber Crime
तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. सदरची फसवणूक झालेली रक्कम पंजाब नॅशनल बँकेचे संशयीत खातेधारकाचे खात्यात पळती झाल्याचे चौकशीत माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने तक्रारदार यांचे रक्कमेचे पुढील रक्कम व्यवहार रोखण्यासाठी तसेच तक्रारदार यांची रक्कम मिळविण्याकरीता तात्काळ संबंधीतांसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. Mumbai Cyber Crime
तक्रारदार यांचे झाले फसवणुकीबाबत वालीव पोलीस ठाणे भादविस कलम 420 सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 66 डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार यांची रक्कम
संशयीत खात्यात गोठविण्यात आल्यानंतर न्यायालयात पाठपुरावा करुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली 1 लाख 76 हजार 645 रक्कम त्यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार अमिना पठाण, सुपर्णा माळी, महिला पोलीस हवालदार माथुरी धिंडे, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल सावळे, विलास खाटीक यांनी पार पाडली आहे.
नागरीकांना आवाहन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोचत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.