पिंपरी चिंचवडपुणे

Pune News : चार वर्षांत पिं.-चिं. महापालिकेच्या दिवाळी बोनस खर्चात ८ कोटींची वाढ; यंदा ६९ कोटींचे वाटप

Pune News : ७ हजार ६०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; सानुग्रह अनुदानातही पाच हजार रुपयांची वाढ

Pune News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिवाळी बोनसच्या खर्चात गेल्या चार वर्षांत तब्बल ८ कोटी ३४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये ६०.५७ कोटी रुपये असलेला बोनसचा खर्च यंदा वाढून ६८.९१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या कालावधीत बोनसच्या खर्चात सुमारे १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा महापालिकेच्या सुमारे ७ हजार ६०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकूण ६८.९१ कोटी रुपयांचा बोनस देण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

बोनसच्या खर्चात वाढ होण्याबरोबरच यंदा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानातही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी २५ हजार रुपये दिले जात होते. त्यात पाच हजार रुपयांची वाढ करून आता ३० हजार रुपये करण्यात आले आहेत. महापालिका आणि कर्मचारी महासंघ यांच्यात झालेल्या पाच वर्षांच्या करारानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि सानुग्रह अनुदान दिले जाते.https://maharashtramirror.com/ Pune News

महापालिकेतील वर्ग एक ते चारमधील कर्मचाऱ्यांसह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांनाही बोनस दिला जातो. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना किमान सुमारे ६० हजार रुपये, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कमाल तीन लाख रुपयांपर्यंत बोनस देण्यात आला आहे. या बोनसच्या कक्षेत सहा महिन्यांपासून कार्यरत असलेले कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक-कर्मचारी, मानधन आणि तासिका तत्त्वावर काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समूह संघटक तसेच निलंबित कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी नाकारला बोनस

महापालिकेत कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांनाही बोनस दिला असलातरी बोनस घेण्यास नकार देणारेही काही काही अधिकारी आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे. त्यांनी स्वत:च बोनस स्वीकारण्यास नकार दिला आहे. कोणत्याही महापालिकेत कार्यरत असताना आपण बोनस घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनाही महापालिकेने आपल्या ४० टक्के हिस्स्यानुसार बोनस दिला आहे. तसेच अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, कचरा वाहतूक वाहनांवरील कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.


पाच वर्षांतील बोनस खर्च (कोटी रुपयांत)
आर्थिक वर्ष बोनस खर्च
२०२२-२३ ६०.५७ कोटी
२०२३-२४ ६१.७१ कोटी
२०२४-२५ ६२.६९ कोटी
२०२५-२६ ६२.७० कोटी
२०२६-२७ ६८.९१ कोटी

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button