Thane Police News : ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालयाची कारवाई
Thane Police News Thane Police All Out Operation : ऑपरेशन दरम्यान 129 हॉटेल, 119 लॉज, 73 बियर बार, 35 डान्स बार अशा एकुण 359 तपासणी कारवाई
ठाणे :- आगामी सण उत्सव व सार्वत्रिक निवडणुका 2024 Lok Sabha Election शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांच्या आदेशान्वये व पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 07 एप्रिल रोजी रात्री 11.00 ते 08 एप्रिल रोजी पहाटे 02.00 वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. सदर ऑल आऊट ऑपरेशनमध्ये परिमंडळ 1,2,3,4 व 5 गुन्हे शाखा, वाहतूक शाखा मधील 238 पोलीस अधिकारी व 962 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. Thane Crime News
ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान शस्त्र अधिनियम अंतर्गत 2 गावठी कट्टे, 4 कोयते, 2 तलवारी, 7 सुरे व 2 इतर हत्यारे असे एकुण 15 हत्यारे हस्तगत करून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल करून एकुण 12 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. Thane Crime News
- अवैध दारूचे एकुण 42 गुन्हे दाखल करून रू.2 लाख 26 हजार 351 ची अवैध दारू जप्त करून एकुण ३८ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
- तंबाखूजन्य पदार्थाच्या अनुषंगाने कोटपा कायदयान्वये 116 जणांवर कारवाई करण्यात आली.
- ऑपरेशन दरम्यान 129 हॉटेल, 119 लॉज, 73 बियर बार, 35 डान्स बार अशा एकुण 359 तपासणी कारवाई करण्यात आली.
- रेकॉर्डवरील 172 हिस्ट्रीशिटर, 109 तडीपार, 136 गुंड असे एकुण 417 सराईत गुन्हेगार यांची तपासणी करून झाडाझडती घेण्यात आली, त्यावेळी 10 तडीपार गुंड मिळून आल्याने त्यांचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.
- अंमलीपदार्थ विरोधी कारवाईचे देखील आयोजन करण्यात आले होते, त्या कारवाईत अंमलीपदार्थ सेवन करणाऱ्या एकुण 38 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली.
- ऑपरेशन दरम्यान 1 लाख 70 हजार 320 किंमतीचे अवैध शस्त्र व 2 लाख 26 हजार 351 किंमतीची अवैध दारू असा एकुण 3 लाख 96 हजार 671 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठाणे पोलीस आयुक्तालयात एकुण 38 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते, त्या दरम्यान एकुण 830 लहान-मोठे वाहने तपासण्यात आली.
वाहतूक शाखेकडून मोटर वाहन कायदयान्वये 104 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 93 हजार 300 चा दंड आकारण्यात आला.