क्राईम न्यूजमुंबई
Trending

Taloja MIDC News : तळोजा MIDC कंपन्यांमध्ये बालमजूर कामगारांचे शोषण

तळोजा जितिन शेट्टी : तळोजा एमआयडीसी येतील UMW मेटल प्रायव्हेट लिमिटेड UMW Metal Private Limited या कंपनीमध्ये बाल कामगार नियम 1987 बाल कामगारांकडून मजुरी करून घेत आहेत अशी माहिती स्थानिक पत्रकार सोमनाथ खिलारे आणि पत्रकार अमोल कोळेकर पाटील यांना समजली त्यानंतर ती माहिती धर्मवीर कामगार सेना या संघटनेशी संपर्क साधून वरील कंपनीवर धर्मवीर कामगार सेनेच्या अध्यक्षा प्रियंका ताई गाडे,विशाल थोरात,पत्रकार अमोल कोळेकर पाटील आणि पत्रकार सोमनाथ खिलारे यांनी संयुक्तपणे वरील कंपनीवर रेड मारली असता या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 12 ते 14 वर्षाच्या वयोगटातील बाल मजूर यांच्याद्वारे कंपनीच्या मालकाकडून जोर जबरदस्तीने काम करून घेत असल्याचे आढळले, यानंतर धर्मवीर कामगार सेनेच्या अध्यक्षा तीव्र भूमिका अशा कंपन्यावरती कायदेशीर रित्या कारवाई झालीच पाहिजे प्रियंका ताई गाडे, स्थानिक पत्रकार सोमनाथ खिलारे, विशाल थोरात आणि अमोल कोळेकर पाटील यांनी कंपनीच्या मालकाशी संपर्क केला असता त्यांनी आमच्या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारची बालकामगार काम करत नाहीत अशा प्रकारची उडवा उडवीची उत्तर दिली,परंतु संयुक्तपणाने जी रेड मारली त्या कंपनीमध्ये बाल मजूर काम करत असल्याचे आढळले आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले, ते चित्रीकरण सुरु असताना त्या कंपनी च्या मॅनेजरने कंपनीतून इतर बाल मजुरांना पळून लावले.

बालमजूर कामगार अधिनियम 1986 नुसार 14 वर्षाच्या आतील बालकांना कामावर ठेवणं हा कायदेशीर गुन्हा आहे व सुधारित कायद्यानुसार 18 वर्षीय खालील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा आहे, त्यामुळे धर्मवीर कामगार सेना तळोजा पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तळोजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून घेतली गेली नाही, त्यानंतर बालकामगार उपायुक्त पनवेल खांदा कॉलनी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेत आम्ही ही गोष्ट आणून दिली

संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच अशा कंपन्यांवरती आपण रेड मारून कारवाई करणार आहोत अशाप्रकारे आश्वासन दिले आणि कामगारांवरचा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही
अशी भूमिका मांडत
पुढील कारवाई आम्ही करतच आहोत
इतर कंपन्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई करणार आहोत…इथून पुढे अशा कुठल्याही कंपन्यांमध्ये जर बालकामगार काम करत असतील तर अशा कंपन्यांवरती देखील आपण कायदेशीर कारवाई कारवाई करावी अशा प्रकारचा एक निवेदन दिले यावेळी धर्मवीर कामगार सेनेच्या अध्यक्षा प्रियंका ताई गाडे, विशाल थोरात स्थानिक पत्रकार सोमनाथ खिलारे आणि अमोल कोळेकर पाटील adv विलास भोर आणि समाजसेवक संजय लाखे हे देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0