मुंबई

Underworld Don Arun Gawli : “डॅडी” ची सुटका.. कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी यांची मुदतीपूर्वी सुटका

•Underworld Don Arun Gawli कुख्यात गॅंग स्टर अरुण गवळी यांना 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारावर गवळी यांची सुटका करण्यात आली आहे

मुंबई :- कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही खंडपीठाने दिला आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती.

तुरुंग प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. आता तुरुंग प्रशासन काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणासह इतर गुन्हेगारी कृत्य केल्याप्रकरणी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

2006 चा शासन निर्णय काय?

2006 च्या शासन निर्णयानुसार वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. त्यानुसारच अरुण गवळीने शिक्षेतून मुदतीपूर्व सुटका करण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय 65 पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल. गवळीचा जन्म 1955 चा असल्याने त्याचे वय 69 वर्ष आहे. जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी 2007 पासून तुरुंगात असल्याने गेली सोळा वर्ष तो तुरुंगात आहे. म्हणजेच वर्ष 2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो. त्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षातून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिला आहे.

कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण काय?

कमलाकर जामसंडेकर यांचा त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत मालमत्तेवरून वाद सुरू होता. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती. प्रताप गोडसेला गवळीने या सुपारीची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपले नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्यास सांगण्यात आले होते. गोडसेनंतर श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची यासाठी निवड केली. या दोघांना अडीच-अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0