मुंबई

Raj Thackeray Teaser :महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा गुढीपाडवाचा टिझर जारी

Raj Thackeray Gudipadwa Sabha Teaser : गुढीपाडवाला होणार ‘राज’गर्जना

मुंबई :-9 एप्रिल ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून आयोजित गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला राज ठाकरे आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असून तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टिझर जारी केला आहे Raj Thackeray Gudipadwa Sabha Teaser . लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Election रणधुमाळी सुरू झालीय. पहिल्या टप्प्याचे अर्ज भरले जात आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या याद्या जाहीर होत आहेत. तोफा धडाडत आहेत. अद्यापही राज ठाकरे Raj Thackeray यांनी आपली भूमिका स्पष्ट केले नसून मध्यंतरी राज ठाकरे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शाह यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा झाली. नंतर मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी राज यांची चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे पुन्हा राजकीय चर्चांमध्ये दिसले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दलचा सस्पेन्स वाढलेला असतानाच मनसेचा गुढी पाडव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. त्यातून एक सूचक विधान करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे Raj Thackeray यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे गुढीपाडव्याला काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहावे लागेल. MNS Gudi Padwa Rally Video Teaser

टीझरमध्ये काय?

मनसेने गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च केला आहे. त्यात राज ठाकरे यांचे भाषण करतानाचे व्हिज्युअल्स दाखवण्यात आले आहेत. तसेच मनसेच्या जुन्या गुढी पाडवा मेळाव्याची शिवाजी पार्कवरील गर्दीही यात दाखवण्यात आली आहे. राजकारणाची झाली दशा, राजविचार दाखवणार महाराष्ट्राला दिशा, असं या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज असल्याचंही या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब ठाकरे यांचा विजय असो या घोषणाही या टीझरमध्ये ऐकायला येत आहेत. MNS Gudi Padwa Rally Video Teaser

कधी आहे मनसेचा गुढी पाडवा?

येत्या 9 एप्रिल रोजी मराठी नववर्ष दिन Marathi Nav Varsha Din म्हणजे गुढी पाडवा आहे. संध्याकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेने गुढी पाडव्याचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निमित्ताने राज ठाकरे शक्तीप्रदर्शनही करणार आहेत. MNS Gudi Padwa Rally Video Teaser

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0