पुणेक्राईम न्यूज
Trending

Pune Crime News | येरवडा, कोंढवा व स्वारगेट परिसरात शटर उचकटून घरफोडी करणारी टोळी जेरबंद : येरवडा तपास पथकाची दमदार कामगिरी

Pune Crime News : येरवडा तपास पथकाची दमदार कामगिरी

Pune Crime News

पुणे, दि. २० मार्च, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News | Yerawada, Kondhwa and Swargate burglary gang arrested: strong performance of Yerawada investigation team

पुणे शहरातील येरवडा, कोंढवा व स्वारगेट परिसरात शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या टोळीला येरवडा तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

घरफोडी करणाऱ्या टोळीचे दरोडेखोर १. तौसिफ बशीर शेख, वय २५ वर्षे, रा. कोंढवा पुणे २. अमोल किसन अवचरे, वय २८ वर्षे, रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे. ३. आजिम सलिम शेख, वय २४ वर्षे, रा. कासेवाडी, भवानीपेठ, पुणे. ४. प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे, वय २४ वर्षे, रा.कासेवाडी, भवानी पेठ, पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

ओंकार सुपर मार्केट व हर्म्स हेरिटेज येरवडा येथे चोरी करणारे संशयीत आरोपी हे वाडिया बंगला नगर पुणे रोड व ब्रम्हासनसिटी वडगाव शेरी येथे उभे असल्याची माहिती तपास पथकाचे पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना मिळाली होती. माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा संतोष पाटील Sr.Pi. Santosh Patil यांनी कारवाईसाठी पथकास रवाना केले. Pune Police Crime news

तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल पाटिल PSI Swapnil Patil व अंमलदार पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, कैलास डुकरे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे, विठ्ठल घुले यांनी बातमीच्या ठिकाणी जात संशयीत इसमांना पळून जात असताना पकडले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी येरवडा परिसरात चोरी केल्याने येरवडा पो स्टे गुर नं २७/२०२४ भादवि ४५७,३८० व गु र नं १०४/२०२४ भादवि ४५४, ४५७, ३८० हे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपींना दि. ०४ रोजी अटक करण्यात आली. पोलीस कस्टडीमध्ये तपासादरम्यान त्यांनी स्वारगेट, कोंढवा परिसरात चोरी केल्याचे सांगितले.

सदर आरोर्पीकडून खालील एकूण ४ गुन्हे उघडकीस आलेले असून एकूण ७८,९००/- रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने त्यामध्ये ४.६ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे ३० कॉईन व सोन्याचे ३ कॉईन व ४१,५००/- रोख रक्कम, ९५३२/- रु किंमतीचे किराणा सामान, ३०,०००/- रु किंमतीची मोटारसायकल असा एकूण १,५९,९३२ रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, संजय पाटील, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, संतोष पाटील, वपोनि येरवडा, श्रीमती आशालता खापरे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.

Pune Traffic Update : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग रोहिदास पवार यांनी दिले निर्देश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0