Vasai Murder Arrested : 4 वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

Vasai Crime Branch 2 Arrested Murder : “मला दारू घेऊ दे” त्या दरम्यान शिवी दिली असता एकाची हत्या करून गेली 4 वर्ष फरार असलेल्या आरोपीला वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 कर्नाटक येथून अटक केली आहे
वसई :- पूनम बार रेस्टारंटचे समोर काऊंटर जवळ (नालासोपारा पूर्व) या ठिकाणी उभे असतांना आरोपी नामे अभिषेक रविप्रकाश पांडे हा पाठीमागुन येवून ” मला पहिले दारु घेवू दे” असे बोलून फिर्यादीस शिवी दिली. तेव्हा फिर्यादीने “तु शिवी का देतो” असे आरोपीस विचारले असता आरोपी अभिषेक रविप्रकाश पांडे यास राग येवुन त्याने फिर्यादीस जबर मारहाण केली मारहाण केली. आरोपी अभिषेक याच्या मित्रांनी ही फिर्यादी याला जबर मारहाण केली या मारहाणीत फिर्यादी याच्यावर चाकूने प्रहार केला या चाकू हल्ल्यात उपचारादरम्यान रुग्णालयात फिर्यादी दिलीप प्रदीप जेठवा (28 वय) याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर अभिषेक रविप्रकाश पांडे, सागर अजय राजोरीया,रोहीत उर्फ बटला अमरनाथ दुबे ,सौरभ उर्फ चिकु जयशंकर पांडे, बाबू उर्फ रक्षित वासुदेव पुजारी अशा 5 आरोपींची नावे निष्पन झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी 302,326,323,504,506,34, कलमांतर्गत चार आरोपींना अटक केली होती. परंतु पाचवा आरोपी बाबू उर्फ रक्षित वासुदेव पुजारी मागील 4 वर्षापासून फरार होता.
अस्तित्व लपवून असलेल्या पाहीजे आरोपीचा शोध घेण्याअनुषंगाने गुन्हयाचा समांतर तपास चालु करण्यात आला. आरोपीचे आई-वडील व बहीण यांचे मोबाईल प्राप्त करुन त्या नंबरचे विश्लेषणातून बल्लेहूनूर, चिकमंगळूर, कर्नाटक येथील एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचे विश्लेषणाव्दारे सदरचा मोबाईल क्रमांक हा पाहीजे आरोपीच्या वडीलांच्या बँक खात्यास जोडलेला असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने फिलपकार्ट ऑनलाईन अँपद्वारे खरेदी केल्याचे दिसून आल्यावर फिरपकार्ट कंपनीस पत्रच्व्यवहार करुन डिलीव्हरी ऍड्रेस व डीलेव्हरी कोणाच्या नाव मागितली गेली आहे याची माहीती घेण्यात आली. ऑर्डर या पाहीजे आरोपी रक्षीत वासूदेव पुजारी याच्या नावाने (बल्लेहुन्नर, चिकमंगळूर, कर्नाटक) येथे हीलव्हरी झाल्याचे दिसून आल्याने आरोपी हा नमुद पत्यावर वास्तव्यास असल्याची उकल झाली. आरोपीचे वास्तव्याची माहीती प्राप्त होताच तपास पथक रवाना करुन नमूद ठिकाणावरुन आरोपीस दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले. आरोपीची. प्रथम धर्म न्यायालय श्रीगेरी कोर्ट येथून ट्रान्झीस्ट रीमांड प्राप्त करून गुन्हयाच्या पुढील कारवाईकरीता त्यास तुळींज पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे.
अस्तित्व लपवून असलेल्या पाहीजे आरोपीचा शोध घेण्याअनुषंगाने गुन्हयाचा समांतर तपास चालु करण्यात आला. आरोपीचे आई-वडील व बहीण यांचे मोबाईल प्राप्त करुन त्या नंबरचे विश्लेषणातून बल्लेहूनूर, चिकमंगळूर, कर्नाटक येथील एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचे विश्लेषणाव्दारे सदरचा मोबाईल क्रमांक हा पाहीजे आरोपीच्या वडीलांच्या बँक खात्यास जोडलेला असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने फिलपकार्ट ऑनलाईन अँपद्वारे खरेदी केल्याचे दिसून आल्यावर फिरपकार्ट कंपनीस पत्रच्व्यवहार करुन डिलीव्हरी ऍड्रेस व डीलेव्हरी कोणाच्या नाव मागितली गेली आहे याची माहीती घेण्यात आली. ऑर्डर या पाहीजे आरोपी रक्षीत वासूदेव पुजारी याच्या नावाने (बल्लेहुन्नर, चिकमंगळूर, कर्नाटक) येथे हीलव्हरी झाल्याचे दिसून आल्याने आरोपी हा नमुद पत्यावर वास्तव्यास असल्याची उकल झाली. आरोपीचे वास्तव्याची माहीती प्राप्त होताच तपास पथक रवाना करुन नमूद ठिकाणावरुन आरोपीस दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी ताब्यात घेण्यात आले. आरोपीची. प्रथम धर्म न्यायालय श्रीगेरी कोर्ट येथून ट्रान्झीस्ट रीमांड प्राप्त करून गुन्हयाच्या पुढील कारवाईकरीता त्यास तुळींज पोलीस ठाणे Tulij Police Station येथे जमा करण्यात आले आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-2 वसई युनीटचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील,सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, पोलीस शिपाई अजित मैड, पोशि/ प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड, रामेश्वर केकान, अविनाश चौधरी, संतोष चव्हाण, सायबर शाखा, यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे.