क्राईम न्यूजमुंबई

Mira Road News : लिंक ओपन केली काही क्षणात 1.47 गमावले, सायबर पोलिसांचे कामगिरी फसवणुकीतील संपूर्ण रक्कम परत मिळवून द्यायला यश

Mira Road Cyber Crime News : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी फसवणुकीतील 1.47 लाख परत मिळवून देण्यास यश

मिरा रोड :- सध्या टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून एक लिंक व्हायरल होत आहे. त्यामध्ये हॅकर्सने बनावट लिंक तयार केली आहे. Mira Road Latest Cyber Fraud News त्यामध्ये ती बऱ्याच ठिकाणी शेअर होत असल्याने अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशाच बनावट लिंकचा बळी पडलेल्या व्यक्तीला फसवणुकीतील संपूर्ण पैसे परत मिळून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. Mira Road Cyber Police सायबर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत फसवणुकीतील एक लाख 47 हजार रुपये परत मिळवून देण्यास यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे चव्हाण यांच्या मोबाईल वर एक लिंक प्राप्त झाली होती. ती लिंक ओपन केल्याने चव्हाण यांच्या बँक खात्यातून एक लाख 47 हजार रुपये काही क्षणातच कपास झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांना तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मिळालेला तक्रारीवरून कपात झालेली रक्कम गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित बँकेचे पत्र व्यवहार करून गोठवण्यात आलेली रक्कम मूळ खातेदाराच्या म्हणजेच चव्हाण यांच्या खात्यावर परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. सायबर पोलिसांच्या या कामगिरीमुळे चव्हाण यांना मोठा आर्थिक फटका बसण्यापासून वाचले आहे. चव्हाण यांनी सायबर पोलिसांचे तसेच मीरा-भाईंदर पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, मिनाग्रीस फर्नांडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, ओंकार डोंगरे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0