मुंबई
Trending

Ramdas Kadam : रामदास कदम यांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य!

Ramdas Kadam On Ajit Pawar : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळे आमची मुख्यमंत्री पदाकरिता असलेली बार्गेनिक पावर कमी झाल्याचा रामदास कदम यांचा दावा

रत्नागिरी :- विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला एकूण 132 जागेवर विजय मिळाल्यामुळे आता मुख्यमंत्री पदाकरिता भाजपच दावेदार असल्याचे सगळीकडून म्हणले जात आहे. तर मुख्यमंत्रीपदावरून शिंदे गट Shinde Group आणि भाजप यांच्या नेतेमंडळी कडून दावे प्रति दावे केले जात असल्याचा प्रकार सध्या राज्याच्या राज्यकारणात पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते यांनी अजित पवार Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. रामदास कदम Ramdas Kadam म्हणाले की अजित पवारामुळे मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केले आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे शिंदे गटाच्या नेत्यांना वाटत आहे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे. अजित पवार शरण गेले असून त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्याने आमची बार्गेनिक पावर राष्ट्रवादीने संपवली असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदावरून कोणीही कितीही काही प्रयत्न केले तरी आमची युती अखंड राहील असेही रामदास कदम म्हणाले आहे.

रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे. जर रामदास कदम यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत असेल आणि आमच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असेल, तर मला वाटते हा निवडणुकीनंतरचा सर्वात मोठा जोक आहे. रामदास कदम फार मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी शांत राहावे. उगाच तळपळाट करुन काही भेटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत मजबूत आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले.

मुख्यमंत्रीपदावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटले, तरी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. मुख्यमंत्री पदासाठी कोणाची निवड होणार, यावरच चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0