मुंबई
Trending

Mumbai Crime News : 42 लाख 75 हजार किंमतीचा 285 ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त

Mumbai Police Busted Drug Smuggler : अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या महिला व पुरुष इसमास अटक करून त्यांच्या कडुन 42 लाख रू. किंमतीचे 285 ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ मुंबई गुन्हे शाखा, कक्ष -12 यांचे कडुन जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई :– महाराष्ट्रात अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करत असताना तब्बल 42 लाखाहून अधिक अंमली पदार्थ विक्री गुन्हे शाखा, कक्ष -12 यांना 3 मार्च 2024 पहाटेच्या सुमारास सार्वजनिक शौचालय जवळ, संतोष नगर, जनरल गोरेगाव पूर्व, मुंबई याठिकाणी एक महिला आरोपी, (39 वर्षे) व एक पुरूष आरोपी नामे मोहम्मद हनिफ रफिक खान, (48 वर्ष) हे संशयीतरित्या आढळुन आले. नमुद पोलीस पथक त्यांचे जवळ गेले असता सदरची महिला व तीचे सोबत असलेला पुरुष हे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कक्ष-12 चे पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्या दोघांच्या ताब्यात रूपये 42 लाख 75 हजार किंमतीचा 285 ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ, रोख रक्कम 1 लाख 11 हजार 500 रुपये व डिजीटल वजन काटा इत्यादी मुद्देमाल मिळुन आला. त्याप्रमाणे त्यांच्या विरोधात कलम 8 (क), 22 (क), 29 एन. डी. पी. एस. कायदा 1985 (दिंडोशी पोलीस ठाणे ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. Mumbai Crime News

आरोपींच्या ताब्यात मिळुन आलेला अंमली पदार्थ त्यांनी कोठुन आणला व ते कोणास विक्री करणारे होते याबाबत अधिक तपास करणे असल्याने त्यांना न्यायालया समक्ष हजर केले असता न्यायालयाने 7 मार्च 2024 पर्यत पोलीस कोठडी दिली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास कक्ष 12 करीत आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (CP Vivek Phansalkar) , विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1), विशाल ठाकुर,सहाय्यक पोलीस आयुक्त (प्र-उत्तर), काशिनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रासकर, पोलीस हवालदार लक्ष्मण बागवे, सुनिल चव्हाण, शैलेश बिचकर, विशाल गोमे, प्रसाद गोरुले, महिला पोलीस हवालदार कदम (नेमणुक कक्ष-11), महिला पोलीस शिपाई खाडे (नेमणुक कक्ष-10) यांनी पार पाडलेली आहे. Mumbai Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0