उत्तरेश्वर शिंगणापूर यांचा कळंब बसआगार येथे सेवापूर्ती सत्कार
कळंब :- कळंब येथील उत्तरेश्वर बापूराव शिंगणापूरे (का.क. मेकानिक ) यांत्रिकी विभाग हे दिनांक २९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एसटी महामंडळ
३४ वर्ष सेवा (२ वर्ष धाराशिव व ३२ वर्ष कळंब बस आगार ) सेवापूर्ती करून सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती निमित्त कळंब बसआगार कर्मचारी यांच्यावतीने श्री दत्त मंदिर सभागृह येथे दिनांक १ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळंब बस आगार व्यवस्थापक बालाजी भारती, मुकेश कोमटवार अशोक मेहेत्रे विभागीय अध्यक्ष कामगार सेना, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर बाराते, गुणवंत कामगार संघटना प्रदेश सचिव व कळंब eps-95 सेवा निवृत्त कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष अच्युतराव माने ,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प .महादेव महाराज अडसूळ ,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भडंगे, ज्येष्ठ कामगार नेते कल्याण कुंभार ,रूपचंद जगताप ,पत्रकार माधवसिंग राजपूत यांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांनी उत्तरेश्वर शिंगणापूरे यांचा संपूर्ण पेहराव ,फेटा ,पुष्पहार व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार केला व त्यांच्या यशस्वी सेवेचा गौरव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी तर आभार गवळी मॅडम यांनी मानले कार्यक्रमासाठी शिंगणापूरे कुटुंबीय शांतीलिंग शिंगणापूरे , राजाभाऊ सिंगनापुरे ,नाना शिंगणापुरे , बसवेश्वर शिंगणापूरे, शंकराआप्पा गोरे, पत्नी अश्विनी शिंगणापूरे, मुली ऐश्वर्या ,साक्षी यांच्यासह कुटुंबीयांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस .बी .गीते, राजाभाऊ गोरे ,अंगद कापसे, यांनी परिश्रम घेतले.