Bhiwandi Police News : भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 यांची कारवाई, लाखो रुपयांचा गांजा जप्त

Bhiwandi Police Latest News : पोलिसांनी आरोपीकडून 12 लाख 90 हजार रुपये किंमतीचा 25 किलो गांजा जप्त केला आहे
भिवंडी :- भिवंडी येथील Bhiwandi Police मिल्लतनगर भागातून गांजा विक्री Ganja Selling करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.तातेराव बाळीराम गवते, (वय 27 , रा. ता. लोहा, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 12 लाख 90 हजार 764 रुपये किमतीचा 25 किलो 964 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
मामा भांजा दर्गा, मिल्लत नगर, भिवंडी येथे परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे, पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तातेराव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे 25 किलो 964 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत बाजारात 12 लाख 90 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी त्याच्याविरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच, हा गांजा कोणासाठी आणला होता तसेच तो कुठून आणला होता याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1 यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक 2, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटिल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार सुनिल साळुंखे, शशिकांत यादव, रंगनाथ पाटील, किशोर थोरात, प्रकाश पाटिल, वामन भोईर, साबिर शेख, सचिन जाधव, महिला पोलीस हवालदार माया डोंगरे, श्रेया खाताळ, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, उमेश ठाकुर, रविंद्र साळुंखे यांनी केलेली आहे.