महाराष्ट्र

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, काल रात्री उशिरा छत्रपती संभाजी नगर विमानतळावर शहा यांचे आगमन

Amit Shah Visit Maharashtra : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अकोला जळगाव छत्रपती संभाजी नगर आणि मुंबईत मुक्काम

छत्रपती संभाजीनगर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र Amit Shah Visit Maharashtra दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अमित शहा यांची सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यानतंर ते मुंबईत मुक्कामासाठी दाखल होणार आहेत. यावेळी सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. Amit Shah Visit Maharashtra

गृहमंत्री अमित शहा यांचा कसा असणार आहे दौरा?

सकाळी 10. 35 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोलाकडे रवाना होतील. अकोला व जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायंकाळी 5.40 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने आगमन व हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व राखीव असेल. सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने क्रांती चौककडे प्रयाण करतील. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वरकडे प्रयाण करतील. सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी सभेस उपस्थिती व संबोधन करतील. सायंकाळी 7.30 मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 7.45 मिनिटांनी विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

छत्रपती संभाजी नगर मध्ये 188 कलम लागू

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाच मार्चला शहरात येणार असून, व्हीव्हीआयपी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात 4 मार्च ते ५ मार्च या काळात छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘नो ड्रोन झोन’ घोषित करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. ‘नो ड्रोन झोन’ साठीचा प्रतिबंधक आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी लेखी आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188 आणि व प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यईल. हा आदेश चार मार्चपासून पाच मार्चपर्यंत अमलात राहणार आहे.

अमित शहा यांच्याकडून जागा वाटपा करिता मध्यस्थी

महायुतीत जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत भाजपने 30 ते 32 जागा लढवाव्यात, असे केंद्रीय नेत्यांचे मत आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून एकूण 38 जागा मागितल्या गेल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. आता मित्रपक्षांची मागणी कमी करुन भाजप 30 जागा आणि उर्वरित मित्रपक्ष 18 जागा लढवण्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न अमित शहा करणार आहे. त्यासाठी अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0