पुणे

Mumbai-Pune Highway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, अपघातात महिला अधिकारी यांचा मृत्यू

Mumbai Pune Highway Bus Car Accident एसटी बसची मोटारीला धडक, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू

पुणे :- रविवारी (25 ऑगस्ट) मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी रेल्वे स्थानक परिसरात भरधाव एसटी बसने मोटारीला धडक दिली या धडकेत महिला अधिकारी यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.अपघातात मोटारीतील भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. Mumbai-Pune Highway Accidentअपघातात महिलेचा पती आणि मोटार चालक भाऊ, तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातात एसटी बसमधील 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले.

मनिषा विजयसिंह भोसले (40 वर्ष, रा. कवठे महंकाळा, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी महिलेचे नाव आहे.Mumbai-Pune Highway Accident याप्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालक अनंत पंजाबराव उईके (33 वर्ष, रा.नारायणगाव) याला ताब्यात घेतले असून, खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले आणि त्यांचे पती शासकीय अधिकारी आहेत. मनिषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालु्क्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली भागात राहणाऱ्या भावाकडे आल्या होत्या. दरम्यान पुरंदरला बदली झाल्याने भोसले यांनी हडपसर भागात भाडेतत्वावर घर घेतले आहे. रविवारी सकाळी मोटारीतून भोसले, त्यांचे पती आणि भाऊ हडपसरकडे निघाले होते. Mumbai-Pune Highway Accident एसटी बस शिवाजीनगर स्थानकातून नारायणगावकडे निघाली होती.खडकी रेल्वे स्थानक परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.अपघातनंतर एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले. एसटी बसने एका मोटारीला आणि दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.अपघातानंतर रहिवासी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच भाेसले यांचा मृत्यू झाला. अपघातात भोसले यांचे पती आणि मोटारचालक भाऊ जखमी झाला असून, त्यांच्यावर ससूनमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातात एसटी बसमधील 12 प्रवाशांना दुखापत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0